include_once("common_lab_header.php");
Excerpt for SAMARPAN by , available in its entirety at Smashwords

सूर्य उद्याचा


उद्याचा सुर्य उगवेल

फक्त आमच्यासाठी

दिशा उजळुन टाकण्यासाठी

उज्वल भवितव्याच बीज पेरण्यासाठी


आता जग नाही आमच्याबरोबर

एकटच वाट शोधतोय होवुन

आम्ही सैरभैर

पण एक दिवस जग येईल

आमच्या पाठीमागुन आम्हाला

सलाम करण्यासाठी


नाउमेद होवुन आम्ही माग हटणार नाही

संकटान खचुन जाणार नाही

वा-या - वादळात अचल उभ राहिन आम्ही

उच्च ध्येय गाठण्यासाठी


एकच लक्ष क्षितिजाला पार करण्याच

मनात पेरलय

काळजात धगधगत ठेवलय

जीवाच रान केलय आता आम्ही

शुन्यातुन विश्व निर्माण करण्यासाठी

आई


आई तुझ दुःख मला दे

माझ सुख तुला घे


आई तुझे अश्रु माझ्या डोळयातुन वाहु दे

माझ्या गालावरच हसु तुझ्या गालावर उमटु दे


आई तुझ्या वेदनेचा हुंदका माझ्या गळयात दाटुन येऊ दे

तुझ्या जखमेच्या वेदना माझ्या शरीरावरून पसरू दे


आई तुझ्या काळजावरचे घाव - आघात मला सोसु दे

तुझ्या नशीबातले कठोर भोग मला भोगु दे


आई तुझ हालाखीच जीण मला जगु दे

तुझ्यावरचे अन्याय-अत्याचार मला झेलु दे


आई तुझा काटयातला खडतर मार्ग मला चालु दे

तुझ्या जीवनातले सुख-आनंदाचे क्षण मला पहायचे भाग्य मिळु दे


आई विसरून जावस कटु क्षण तुझ्या तु तुझ्या जीवनातले

परमेश्वर तुला बळ देवु दे

तुझ जीवन सुख-आनंदाने बहरू दे
मला शाळत जायाच हाय


पाटी - दप्तर घेऊन

शाळत जायाच हाय

पेन - पेन्सिलीन

वहीत गिरवायच हाय

मला शाळत जायाच हाय


मित्रांसोबत लपाछपी - शर्यतीचा

खेळ खेळायचा हाय

छान - छान गाणी गायाच हाय

मला शाळत जायाच हाय


- बाराखडी

सुंदर - सुंदर गणितातले पाढे म्हणायचहाय

मला शाळत जायाच हाय


गोड- गोड गोष्टी मलाबी ऐकायच हाय

नाचत - नाचत गाणी म्हणायच हाय

मला शाळत जायाच हाय


छोटी-मोठी बक्षीस मलाबी जिंकायची हाय

गुरूजी - बाईंची शाबासकी मिळवायची हाय

मला शाळत जायाच हाय


टाटा बाय बाय हाय हॅलो म्हणायला शिकायच हाय

खुप - खुप शाळा शिकुन साहेब बनायच हाय

मला शाळत जायच हाय

सलाम


सलाम

तुमच्या कर्तुत्वाला

देशासाठी दिलेल्या बलिदानाला

तुमच्यात ठासुन भरलेल्या देशभक्तीला


सलाम

निधडया छातीला

तुमच्यातल्या स्वाभिमानाला

अन् निर्भिड बाण्याला


सलाम

तुमच्या धैर्याला आणि जिद्दीला

सळसळत्या रक्ताला

तुमच्या जगण्याला


सलाम

ताठ मानेन संकटाला

सामोरे जाण्याला

तुमच्या निष्टेला

तुमच्यातल्या कणखर तत्वाला


सलाम

भारतमातेबद्दल असलेल्या

अभिमानाला

तुमच्या इमानदारीला

तुमच्या रक्ताच्या थेंबा-थेंबाला


सलाम

तुमच्या तत्परतेला

अगाध इच्छाशक्तीला

अन् अमरत्वालातु


तु श्वास होतीस

तु ध्यास होतीस

जगण्याच बळ होतीस तु

स्वप्नांची पहाट होतीस तु


तु गालावरच हसु होतीस

तु जगण्याची उमेद होतीस

दुःखी मनाचा आसरा होतीस तु

प्रेमाचा ओलावा होतीस तु


तु माझे शब्द होतीस

तु माझी दृष्टी होतीस

जगण्याचा आत्मसन्मान होतीस तु

रखरखत्या ऊन्हातली सावली होतीस तु


तु माझा अभिमान होतीस

तु माझा स्वाभिमान होतीस

अंधारातला प्रकाश होतीस तु

पाठीवरचा हात होतीस तु


तु उजळलेल घर होतीस

तु रथाच सारथ्य होतीस

माझ अस्तित्व होतीस तु

माझ सर्वस्व होतीस तु

अस्वस्थ


कालच्या आठवणीवर

ऊद्याच्या आशेवर

जगतात कितीतरी अस्वस्थ जीव


सफल-असफलता

पेलत-झेलत

जगतात कितीतरी अस्वस्थ जीव


एका टप्यावर खचतात

दुस-या टप्यावर उभ राहतात

मरणकळा सोसुनही

हसतात कितीतरी अस्वस्थ जीव


जय-पराजय समान पातळीवर तोलतात

अपयशाच्या दाहकतेने कधीच न खचतात

ध्येयपुर्तीची अभिलाषा बाळगुन

जगतात कितीतरी अस्वस्थ जीव

आशावादी


संपुन जाईल वनवास कधीतरी

मोकळा श्वास घेईन कधीतरी

येनारे दिवस असतील फक्त माझ्यासाठी


आनंदाने न्हाऊन जाईन कधीतरी

स्वप्नातल्या दुनियेत उंच भरारी घेईन कधीतरी

येनारे दिवस असतील फक्त माझ्यासाठी


सुंदर जीवनाचा आस्वाद घेईन कधीतरी

प्रेमभ-या दुनियेत रममान होईन कधीतरी

येनारे दिवस असतील फक्त माझ्यासाठीभरारी


नव्या वाटा

नव्या दिशा

तरुण मनाच्या

उंच झोक्याच्या


कोण आडवेल आम्हाला

आमच्या कर्तृत्वाला

दिलय आव्हान आम्ही आमच्यातल्या

सामF;kZला


घेतलीया शपथ आम्ही

उंच भरारी घेण्याची

क्षितीजाला पार करण्याची

जागविलय आता आम्ही

आमच्यातल्या नव्या शक्तीला


लेखतील तुच्छ जे लेखु देत आम्हाला

कुणाच भय नाही आमच्या मनाला

पाऊल पुढ टाकलय आता जग सार बदलण्याला


व्यसन मृगजळाकडून विनाशाकडे


नको करु तु कशाचेच व्यसन

टाकत ते सुपवुन जीवन


निर्व्यसनी बनुन जग जीवन

घे आनंद तु परीपुर्ण जीवनाचा


जीवन हे अनमोल आहे

येईल तेव्हाच समजुन


जेव्हा निर्व्यसनी बनुन

जीवन पाहशील जगुन


क्षणांची मजा असते

जीवनाची दुर्दशा होवून जाते


नको जवळ घेवु त्याशत्रुला

दुर लोट त्या व्यसनाला


जीवन किती सुंदर असत

हे तेव्हाच येईल समजुन


जेव्हा जगु लागशील जीवन

निर्व्यसनी बनुनविणवणी


सार काही विसरलो आम्ही

तल्लीन झालो तुझ्या भजनात

तुझा स्पर्श व्हावा देवा आमच्या जीवनात


नको पैसा] नको बंगला-गाडी

सगुन विचारांची आमच्या मनामध्ये

असावी माडी

परमेश्वरा एवढीच इच्छा आमच्या

चिमुकल्या मनात


दुखी-दुर्जनांना मिळावा

तुझा आधार

तुझ्याविना आम्ही निराधार

साथ असावी तुझी सुख-दुखात


तुझ्या नामस्मरणात कोवळे

मन आमुचे फुलते

आमच्या नसा-नसातुन नव गीत संचारते

उत्साह पसरावा आमच्या जीवनातपरमेश्वरा


तुझ्या मार्गाने मी चालावे

कल्याण तिथे साधावे

मोह मत्सर क्रोध

लोप सारे पावावे

तु वाट दाखवावी तु साथ दयावी

परमेश्वरा तु शक्ती दयावी


तुझ्यात सारे विश्व सामावले

सगुन आमचे फुलुन यावे

नव विचारांनी प्रेरीत व्हावे

तु वाट दाखवावी तु साथ दयावी

परमेश्वरा तु शक्ती दयावी


दुःखात धैर्याने उभे रहावे

संकटाचा जिद्दीने सामना करावे

नव ध्येय आम्ही गाठावे

तु वाट दाखवावी तु साथ दयावी

परमेश्वरा तु शक्ती दयावी


मन माझ खंबीर बनावे

खचुन कधी मी न जावे

प्रफुल्लीत सदा मी रहावे

तु वाट दाखवावी तु साथ दयावी

परमेश्वरा तु शक्ती दयावी
उत्तर दया मला...


शिवरायांना घडविणारी जिजामाता आठवत नाही तुम्हालाॽ

मधुर गोड आवाजाने जग जिंकणारी लता मंगेशकर नको तुम्हालाॽ

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽ


रणांगणावर लढणारी झाशीची राणी आठवत नाही तुम्हालाॽ

टेनिस जगतात साम्राज्य गाजवणारी सानिया मिर्झा नको तुम्हालाॽ

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽ


रमाई आठवत नाही तुम्हाला\

नेमबाजीत देशाच नाव जगात कोरणारी अंजली भागवत नको तुम्हाला\

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽ


शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवणारी क्रांतीज्योती सावित्रीमाता

आठवत नाही तुम्हालाॽ

दिल्लीच्या तख्तावर राष्ट्रपतीपदी विराजमान होणारी प्रतिभाताई पाटील

नको तुम्हालाॽ

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽअंतराळात झेप घेणारी कल्पना चावला आठवत नाही तुम्हालाॽ

कर्तृत्ववान पोलिस अधिकारी किरण बेदी नको तुम्हालाॽ

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽमराठी -हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी स्मिता पाटील आठवत नाही तुम्हालाॽ

समाजसेवेला वाहुन घेतलेल्या मेधा पाटकर नको तुम्हालाॽ

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽ


देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आठवत नाहीत तुम्हाला\

अनाथ - निराधारांना पोटाशी धरणा-या सिंधुताई सपकाळ नको तुम्हाला\

होय मी मुलगी बोलतेय उत्तर दया मला

का माझा तिरस्कार तुम्हालाॽ
क्रांतीज्योती


सावित्रीमाते आज तुझ्या लेकी

तुला विसरत चालल्या आहेत

फॅशनच्या दुनियेत हिरोईन बनायला चालल्या आहेत


लिपस्टिक-पावडर

अॅब्रो-ब्युटी पार्लर

तुला झेलाव्या लागलेलाशेणा मुताचा मार विसरत चालल्या आहेत

सावित्रीमाते आज तुझ्या लेकी हिरोईन बनायला चालल्या आहेत


तुझ्या लेकींच्या शिक्षणासाठी तु रक्तबंबाळ झालीस

उपाशी पोटी राहून ज्ञानाची मशाल पेटवत राहिलीस

तुझ्या स्वाभिमानाला लेकी विसरत चालल्या आहेत

सावित्रीमाते आज तुझ्या लेकी हिरोईन बनायला चालल्या आहेत


तु नसतीस तर आज तुझ्या लेकींची काय अवस्था झाली असती\

नक्कीच त्यांना कल्पना नाही

तुझी शिकवण विसरून भलत्याच मार्गावर चालल्या आहेत

सावित्रीमाते आज तुझ्या लेकी हिरोईन बनायला चालल्या आहेत


आज तुझ्या लेकी डक्टर]वकील झाल्या आहेत

स्वतापुरत फक्त स्वतापुरत जगत आहेत

तुझ्या तत्वाला विसरत चालल्या आहेत

सावित्रीमाते आज तुझ्या लेकी हिरोईन बनायला चालल्या आहेत


माते तुच आम्हा सा-यांमध्ये ज्ञान-ज्योत पेटविलीस

शिक्षणान माणसातल माणुसपण जागविलीस

माते तुझ्या त्यागाला त्या विसरत चालल्या आहेत

सावित्रीमाते आज तुझ्या लेकी हिरोईन बनायला चालल्या आहेत
अमर गीत


नसताना तु जीव होतो कासावीस

तु सदैव जवळ माझ्या असावीसहसावीस-रुसावीस

बोलता - बोलता माझ्यावरती चिडावीस

हरणीसारखी माझ्यासमोरुन पळावीसतुझ्यातल विश्व माझ तु जपून ठेवावीस

सार काही विसरुन तु माझ्यात सामावुनी

जावीस

एकांतांची जाणीव मनाला कधी न होवु

दयावीसगेलीस जरी कुठे तरी घरटयाच्या

ओढीने परत यावीस

आधाराची माझ्या काठी बनुन रहावीस

जगन इथच-मरण इथच

अमर गीत तु गावीसगांधीबाबा


पुन्हा तुमच्या सत्य-अहिंसेच्या शस्त्राने आम्हाला लढायच आहे

तुमच्या स्वप्नातला भारत साकारायचा आहे


बंदुकीच्या गोळयांची भाषा बोलणारी नवी पिढी निर्माण होतेय

शांतीचा भंग करून दहशतवादाचे समर्थन करणारी विचारधारा रूजु पाहतेय

या सा-यांना सत्य अहिंसेच्या शस्त्राने नेस्तनाभुत करायच आहे

गांधीबाबा

तुमच्या स्वप्नातला भारत साकारायचा आहे


पुन्हा नव्या क्रांत्या होतील पुन्हा नवे उठाव होतील

सत्याची कास धरून पुढे-पुढे चालायच आहे

आम्ही विसरलेलो नाही तुमच्या संयमी कणखर तत्वांना

जरी आले ना कोणी एकट चालायच आहे

गांधीबाबा

तुमच्या स्वप्नातला भारत साकारायचा आहे


मार्ग असला काटयाकुटयांचा रक्ताळली जरी पाऊले

वाट असेल वादळवाट रात्र असेल अंधारलेली

तुटणार नाही खचणार नाही

पुन्हा आम्हाला एकट चालायच आहे

गांधीबाबा

तुमच्या स्वप्नातला भारत साकारायचा आहे

हिंसेचे समर्थन करणारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे

गांधीबाबा तुमच्या विचारांना तिलांजली देवून तुमच्या त्यागाने

घडलेल्या भारतभुमीमध्ये रक्तरंजित क्रांती घडवु पाहत आहेत

पुन्हा आम्हाला मानवतेची मशाल पेटवायची आहे


गांधीबाबा

तुमच्या स्वप्नातला भारत साकारायचा आहे

आम्ही थंड असलो तरी षंढ नाही

रक्ताळलेले बंड आम्हाला मान्य नाही

पुन्हा नव्याने स्वातंत्र्याची लढाई

शांती -सत्य-अहिंसेच्या शस्त्रांनी लढायची आहे

गांधीबाबा

तुमच्या स्वप्नातला भारत साकारायचा आहे

म्हणे मी जगाचा पोशिंदा\


माझ्या डोळयातील अश्रु दिसत नाहीत तुम्हालाॽ

माझ्या बायका-पोरांचा हंबरडा ऐकायला येत नाही तुम्हालाॽ

म्हणे मी जगाचा पोशिंदाॽ


वाचन-भाषणापुरत मर्यादित ठेवलय मला

विसरलात काळया आईलाॽ

म्हणे मी जगाचा पोशिंदाॽ


वर्षानुवर्षे पडलेला दुष्काळ दिसत नाही तुम्हालाॽ

अन्न-पाण्याविना ऊपाशी राबणारे हात दिसत

नाहीत तुम्हालाॽ

म्हणे मी जगाचा पोशिंदाॽ


संवेदनशुन्य झालात तुम्हीॽ

इतके कृतघ्न झालात तुम्हीॽ

म्हणे मी जगाचा पोशिंदाॽ


तुम्हाला पेट्रोल - डिजेल महागल तर चालत

मग भाजीपाला का नकोॽ

म्हणे मी जगाचा पोशिंदाॽ


खरच!मी शेतकरी राजा ?

भिकारी बनवलंय तुम्ही मला भिकारी

म्हणे मी जगाचा पोशिंदा\


आमच्या आत्महत्या दिसत नाहीत तुम्हाला?

कठोर काळजाचा दगड झालात तुम्ही?

म्हणे मी जगाचा पोशिंदा\

आमचे दुख: वेदना जाणवत नाहीत तुम्हाला?

संवेदनशून्य झाला आहात तुम्ही?

म्हणे मी जगाचा पोशिंदा\


तुमच्या मुलांनीच फक्त चांगल शिक्षण का घ्यायच ?

आम्ही मात्र अहोरात्र राबायच ?

म्हणे मी जगाचा पोशिंदा\


तुम्हीच फक्त चांगल्या नोकरी-व्यवसायावर राज्य करायचं

आमच्या मुला-बाळांच्या भविष्याची काळजी कोण करायचं?

म्हणे मी जगाचा पोशिंदा\
वारसा


तुम्हालाच टिकवायचा आहे शिवरायांचा वारसा

नुसताचजयजयकार करुन नव्हे

नुसत्याच जयंत्या साज-या करुन नव्हे

त्यांच्या विचारांच्या मशाली पेटवून


तुम्हालाच टिकवायचा आहे शिवरायांचा वारसा

नुसतेच गुणगान गाऊन नव्हे

नुसतेचगड-किल्ले पाहुन नव्हे

त्यांचे कर्तृत्व अंगी बाणवून


तुम्हालाच टिकवायचा आहे शिवरायांचा वारसा

नुसत्याच स्वाभिमान अन् अभिमानाच्या बाता मारुन नव्हे

नुसतीच पोकळ गर्जना करुन नव्हे

त्यांच्या कणखर तत्वांना हृदयात कायमचे स्थान देवुन


तुम्हालाच टिकवायचा आहे शिवरायांचा वारसा

नुसतीच यशोगाथा वाचुन नव्हे

नुसतीच पराक्रमाची स्तुती करुन नव्हे

हे सार अमलात आणुन

हुंडा


हुंडा घेवू नका - हुंडा देवू नका

लाचार मनान जन्मांतरीची

गाठ बांधु नका


हुंडयामुळे तुटतात नाती रक्ताची

जवळच्या माणसावर वेळ येते

विश्वासघाताची


स्वाभिमान गमावुन घेवु नका हुंडा

लाचार पणाचा आहे तो धोंडा


हुंडा घेवुन खोठा मोठेपणा

मिरवु नका

हुंडा घेणे हा कायद्याने

गुन्हा आहे हे विसरुन जावु नका


सर्वांना घेवुन विश्वासात

बांधा जन्मांतरीची गाठ

चार पैशाला बळी पडून

लावुन घेवु नका वाट


हुडयामुळे जाते विश्वासाला तडा

मग शासनही गप्प बसत

नाही शिकविल्या शिवाय धडा


किती संसार उध्वस्त झाले

या हुंaaडयामुळेॽ

माणसा आतातरी उघडतील काय तुझे डोळे


निष्पाप जीव संपुन जातात

या हुंडयाच्या ओझ्याखाली

नका राहु लोकहो चार पैशाच्या

आशेखाली


सुखी संसारासाठी राहु दूर

हुंडयापासून

अनिष्ट रुढी परंपरा लावुपळवुन


नव्या भारताची नवस्वप्ने

आपल्या हातामध्ये

हुंडा कधीच घ्यायचा नाही

आपण आपल्या जीवनामध्ये


आहे कटीबध्द राहु वचनबध्द

आपल्या मताशी

लढत राहु आपण जीवनभर

हुंडा घेणा-या शत्रुशीलोकसाधना


खेडया-पाडयात

वाडया - वस्तीत

उपाशी पोटी फिरत राहिलात

ज्ञानाची ज्योत पेटवत राहिलात

स्वप्न उराशी बाळगुन लढत राहिलात


ना जिवाची पर्वा होती

ना श्वापदांचा भय होत

तरीही तुम्ही झिजत राहिलात

ज्ञानाची ज्योत पेटवत राहिलात

स्वप्न उराशी बाळगुन लढत राहिलात


तुम्ही सावित्रीमाता

तुम्ही महात्मा

दिप होऊन तेवत राहिलात

ज्ञानाची ज्योत पेटवत राहिलात

स्वप्न उराशी बाळगुन लढत राहिलात


रंजल्या - गांजल्यांचे तुम्ही मायबाप

अनाथ - निराधारांचे तुम्ही नाथ

अनेकांची स्वप्ने फुलवून नवे आयुष्य बहाल केलात

ज्ञानाची ज्योत पेटवत राहिलात

स्वप्न उराशी बाळगुन लढत राहिलातलोकमान्यांच्या पुण्यभूमित ज्ञानसाधनेचा यज्ञकुंड पेटवित राहिलात

नवभारताच्या नव्या पिढया घडवित राहिलात

लोकसाधनेची तपस्या करत राहिलात

ज्ञानाची ज्योत पेटवित राहिलात

स्वप्न उराशी बाळगुन लढत राहिलात


त्यागी - निस्वार्थी भावना

दिन-दुबळयांना पोटाशी धरलात

दुःखितांचे अश्रु पुसुन गालावरती हसु खुलविलात

ज्ञानाची ज्योत पेटवित राहिलात

स्वप्न उराशी बाळगुन लढत राहिलातमन वेड


मन गुंतल काळया-काळया

मातीत

हिरव्या - हिरव्या रानात

कधी पाखराभोवती मन वेड

भिरभिरत

कधी खळाळत्या पाण्याला न्याहाळत

बेधुंद होवुनी गाऊ लागत


पक्षांचा चिवचिवाट

पानांच सळसळण

फुलांच बहरण

हा पाहुणी नजारा

मन प्रफुल्लीत होवुनी जात


गवसणी घालावी तरी

कशी याला

बंधन सारी जुगारुन

निसर्गाच्या खेळात रंगुनी जात
बालपण माझ करपून जातय...


हाताची घडी - तोंडावर बोट

प्रश्न विचारला तरी तु लहान आहेस तुला कळत नाही

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातयहसण्याच बंधन]बोलण्याच बंधन

पिंज-यातल्या पोपटासारखी दयेची याचना माझ्या नशीबी

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातयमाझी लहान चुकही तुमच्यासाठी मोठा गुन्हा ठरतोय

मारू नका हो गुरूजी दयची याचना करतोय

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातयखेळण्या - बागडण्याच बंधन

मनासारख जगण्याच बंधन

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातयमी लहान आहे हा माझा गुन्हा आहे का?

खूप मोठ मी पाप केलय का?

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातय


माझ्या भावनांचा विचार का कुणी करत नाही?

तुम्हीही लहान होता हे विसरत तर नाही?

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातय


हुकुमशाही - दंडुकशाही रोजचीच तुमची

ईच्छा - आकांक्षांची कशी होणार पुर्ती?

हात जोडतो थांबवा आता

बालपण माझ करपून जातय
Purchase this book or download sample versions for your ebook reader.
(Pages 1-46 show above.)